Overview
◾️ रशियानं अत्याधुनिक एअर डिफेन्स मिसाइल सिस्टम S-400 भारताला लवकरच देण्याचा निर्णय घेतला आहे.
◾️ रशियाचे उपपंतप्रधान युरी इवानोव्हिक यांनी हे ब्रह्मास्त्र लवकरच भारताला देण्याचं आश्वासन दिलं आहे.
???? कशी आहे S-400 सिस्टिम ????
◾️एस-४०० ही रशियाची जमिनीवरून हवेत मारा करणारी, लांब पल्ल्याची अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली आहे.
◾️त्याला नाटो संघटनेने एसए-२१ ग्राऊलर असे नाव दिले आहे. त्याद्वारे ३० किमी उंचीवरील आणि ४०० किमी अंतरावरील क्षेपणास्त्रे, विमाने, ड्रोन आदी पाडता येतात.
◾️ एस-४०० प्रणालीत चार प्रकारची वेगवेगळ्या पल्ल्याची क्षेपणास्त्रे आहेत. त्यातील
???? ‘९ एम ९६ ई’ हे क्षेपणास्त्र ४० किमीवरील लक्ष्याचा वेध घेऊ शकते.
???? ‘९ एम ९६ ई २’ हे क्षेपणास्त्र १२० किमीवर मारा करू शकते.
???? ‘४८ एन ६’ हे क्षेपणास्त्र २५० किमीवर, तर
???? ‘४० एन ६’ हे क्षेपणास्त्र ४०० किमीवर मारा करू शकते.