अजोय मेहता होणार प्रधान सल्लागार

Last Date : 25-06-2020

Overview

येत्या 30 जून रोजी राज्याचे सध्याचे मुख्य सचिव अजोय मेहता हे सेवानिवृत्त होणार आहेत. मात्र सेवानिवृत्तीनंतर ते 1 जुलैपासून मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार म्हणून काम पाहणार आहेत.

मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार म्हणून अजोय मेहता यांना मुख्यमंत्री सचिवालयात 603 क्रमांकाचे दालन व मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती अधिकृतरीत्या देण्यात आली आहे.

कोरोना संकटकाळात दीर्घ अनुभव असणाऱ्या व्यक्तीची मुख्यमंत्री सचिवालयात तातडीची आवश्यकता असल्याने मेहता यांना प्रधान सल्लागार म्हणून नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.

मेहता मुख्य सचिव पदावरून सेवानिवृत्त झाल्यावर त्याजागी संजय कुमार यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या संजय कुमार गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव आहेत.