Overview
महाराष्ट्र शासनाच्या ‘महास्वयंम’ वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करण्याची पद्धती :-
महास्वयंम वर अर्ज कसा करावा किंवा खाते कसे तयार करावे या बद्दल माहिती असणानारी PDF download करा
किंवा
खाली दिलेल्या सूचनांचे पालन करा
१) प्रथम https://rojgar.mahaswayam.in/#/register ला भेट द्या.
२) नोकरी साधक (नोकरी शोधा) / JOB SEEKER (FIND JOB) हा पर्याय निवडून आपला नोंदणी आधार कार्ड क्रमांक व पासवर्ड टाकून Sign in करा.
३) आपल्या होम पेजवर पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा (संबंधित जिल्हा) हा पर्याय निवडा.
४) आपला जिल्हा निवड करा.
५) चालू किंवा आगामी कालावधीत होणाऱ्या पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यासाठी उपस्थिती नोंदविण्यासाठी क्लिक करा.
६) I Agree हा पर्याय निवडा.
७) आपल्या पात्रतेनुसार विविध कंपन्यांच्या रिक्त पदाची निवड करून Apply बटनावर क्लिक करावे.
8) संबंधित मेळाव्यासाठी दिलेल्या तारखेस ऑनलाईन मुलाखती पद्धतीने (जसे व्हॉट्सअप कॉलिंग स्काईप किंवा टेलीफोनवरून) करीता तयार राहावे.