MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा साठी परीक्षा केंद्र बदलता येणार ... MPSC आयोगाचा निर्णय

Last Date : 14-08-2020

Overview

ठळक बाबी

1) 17 ऑगस्ट 2020 ते 19 ऑगस्ट 2020 पर्यंत बदलत येणार परीक्षा केंद्र

2) केंद्र निवडण्यासाठी पात्र उमेदवार ना आयोगामार्फत SMS द्वारे कळवण्यात येईल

3) प्रथम येणाऱ्यास प्राधान्य, परीक्षा केंद्र ची क्षमता संपल्यानंतर केंद्र ची निवड करता येणार नाही

4) अधिकृत Notification : https://bit.ly/2CxvPxA 


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर MPSCने पूर्व राज्यसेवा पूर्व परिक्षेची नवी तारीख जाहीर केली होती. 13 सप्टेंबर 2020 रोजी निश्चित केलेली राज्यसेवा पूर्व परीक्षा आता 20 सप्टेंबर 2020 रोजी होणार आहे. एमपीएससीकडून(Maharashtra public  service commission) सुधारीत वेळापत्रक जाहीर करण्यात आलं होतं. मात्र अजुनही वाहतूक व्यवस्था पूर्ववत झालेली नाही त्यामुळे विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहोचणार कसे असा विद्यार्थ्यांचा प्रश्न होता. मात्र आता आयोगाने विद्यांसाठी नवी सुविधा दिली असून त्यांना आपलं जवळचं परीक्षा केंद्र निवडता येणार आहे.

आहे. कोरोनाच्या साथीमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. नंतर 13 सप्टेंबर ही तारीख दिली होती मात्र त्याच दिवशी देशव्यापी NEETची परीक्षा होणार असल्याने आयोगाने ही नवी तारीख जाहीर केली होती.

ज्या मुलांनी मुंबई, पुणे केंद्र घेतलं असेल त्यांना याचा फायदा होणार आहे. तर मराठवाडा आणि विदर्भातील विद्यार्थी त्यांना जवळचं परीक्षा केंद्र घेऊ शकतील.

सविस्तर माहिती साठी  : https://bit.ly/2CxvPxA